विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या; बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने उचलले टोकाचं पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. परीक्षेत प्राविण्य मिळवीणारे विध्यार्थी आनंद साजरा करीत असतानाच चंद्रपूर जिल्हात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चिमूर तालुक्यातील नेरी गावातील आकाश वैरागडे या विध्यार्थ्यांने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेरी गावातील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विध्यार्थी चिमूर शहरातील नामांकित शाळेत शिकत होता. बारावीत चांगले गुण मिळविण्यासाठी त्याने वर्षभर मेहनत घेतली होती. परीक्षेत त्याला पेपरही चांगले गेले होते. त्यामुळे परीक्षेत आपल्याला यश मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र बारावीच्या परीक्षेचा निकालाची गुणपत्रिका बघताच त्याला धक्का बसला. इंग्रजी आणि फिजिक्स या दोन विषयात अपेक्षेपेक्षा त्याला फारच कमी गुण मिळाते. त्यामुळे तो खचला होता. कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यात त्याने घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.