IND Vs NZ – गोलंदाज आजही सामना फिरवू शकतात, भुवनेश्वर कुमारने व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. आज, 27 ऑक्टोबर 2026 तिसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला ज्यात टीम इंडियाने बाजी मारली आणि सामन्यासह मालिकाही जिंकली. या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना भुवनेश्वर कुमारने आधुनिक क्रिकेटमधील गोलंदाजीच्या आव्हानांवर आपले विचार मांडले.

पत्रकार परिषदेत बोलताना भुवनेश्वर कुमारने युवा गोलंदाज आणि आधुनिक क्रिकेटवर परखड मत व्यक्त केलं. भुवनेश्वरच्या मते, आधुनिक टी-20 क्रिकेटमध्ये मैदानाचे लहान आकार आणि फलंदाजांना अनुकूल नियम यामुळे गोलंदाजांसाठी चुकांची संधी अगदी नगण्य असते. मात्र, चेंडू गोलंदाजाच्या हातातूनच टाकला जात असल्याने योग्य रणनीती आखून आणि परिस्थितीनुसार वेगाने जुळवून घेऊन गोलंदाज फलंदाजांना रोखू शकतात, असे त्याने स्पष्ट केले.

आयपीएलच्या अनुभवामुळे सध्याची युवा गोलंदाजी फळी अधिक परिपक्व झाली असल्याचे सांगत, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना सातत्य आणि लवचीकता राखणे गरजेचे असल्याचे त्याने नमूद केले. सध्या तो भविष्याचा फारसा विचार न करता देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून, आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियामध्ये पुनरागमन केल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, भुवनेश्वर कुमारने तब्बाल चार वर्षांना टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं असून त्याला आतापर्यंतच्या तीनही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला अद्याप चमकदार कामगिरी करता आली नाही. तीन सामन्यांमध्ये फक्त एक विकेट घेण्यात त्याला यश आलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला भुवनेश्वरकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.