बिग बॉस मराठी येतोय… रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांच्याऐवजी अवघ्या महाराष्ट्राचा  नाहीतर जगभरातील मराठी माणसाच्या गळय़ातील ताईत असलेला ‘लय भारी’ अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. ‘कलर्स’ मराठी वाहिनीने आज ऑफिशियल प्रोमो शेअर करत ‘बिग बॉस मराठी’ सुरू होणार असल्याची घोषणा केली. नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बिग बासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची बाब असते. ‘बिग बास मराठी’च्या यंदाच्या सिझनच्या घराची थीम काय असणार तसेच घरात यंदा कोणते सेलिब्रेटी असणार याची आतापासूनच सर्वांना उत्सुकता लागलीय.