Pune Porsche Case: अखेर पुणे महापालिकेची पबवर कारवाई; चालवला हातोडा

पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने राज्यासह, देशभरातून राज्य सरकारवर टिका होत आहे. त्यानंतर पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी अग्रवाल बिल्डरच्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी कलम वाढवलं आहे. या मुलाला पुन्हा एकदा अल्पवयीन खटल्यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे. देशभरात चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे महापालिकने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर हातोडा चालला आहे.

वॉर्टस आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचा व्हिडीओही समोर आला आहे. बुलडोझर आणि जेसीबीच्या सहाय्याने पबचं बांधकाम पाडण्यात येत आहे.