आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्समध्ये सचिन खिलारीची सुवर्णपदकावर मोहोर

जपानच्या कॅबे येथे सुरु असलेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुण्याच्या सचिन खिलारी याने गोळाफेकच्या एफ -46 या विभागात सुवर्ण कामागिरी केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या खात्यात आता पाच सुवर्ण पदकासह 11 पदके आहेत. याआधी हिंदुस्थानने 2023 मध्ये पॅरिसमध्ये तीन सुवर्णांसह दहा पदके जिंकली होती. सचिनने 10. 30 मीटर गोळा फेक करून 16. 21 मीटरचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.

सचिनने मागीलवर्षी 2022-23 साली झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप एफ-46 या विभागामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.  सचिनने सुवर्णपदक जिंकल्यानंतर म्हणाला, ”मी फार आनंदी आहे, ज्याची अपेक्षा होती ते मिळाले. मी पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र झालो आहे आणि तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेन. ”आता टुर्नामेण्टसाठी अजून तीन दिवस बाकी असून प्रशिक्षक सत्यनारायण यांना पदकांची संख्या वाढण्याची आशा आहे. तो म्हणाला, “आम्हाला आणखी दोन सुवर्णपदकांची आशा आहे.” पदकांची संख्या 17 पर्यंत जाण्याची आशा आहे. याआधी मंगळवारी पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिलने F64 भालाफेकमध्ये आपले सुवर्णपदक कायम ठेवले होते. थंगवेलू मरियप्पन आणि एकता भयान यांनीही सुवर्णपदक जिंकले.