बोगस सातबारा ऑनलाईन प्रकरण: घोटाळा करणाऱ्यांना खतपाणी घालण्याचं काम सरकार करतंय – नाना पटोले

>>सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील सहकरी संस्था येथे बोगस शेतकऱ्यांची नोंदणी करून बोनसच्या पैशाची उचल केली आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की राज्य सरकारच अशा प्रकाराला खतपाणी घालत आहे. या आधी सुद्धा धान खरेदी केंद्र चालकांनी अपहार केला होता.

देशातील शेतकऱ्यांना लुटण्याचा पाप ही सरकार करत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

अमरावती येथील शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी जम्मू कश्मीर येथील शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे. यावर नाना पटोले बोलले की देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत. पीएम किसान निधी घोटाळा हा फक्त अमरावतीत नाही तर देशात होत आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे प्रधानमन्त्री इन्शुरन्स कंपनी मधील आपल्या मित्रांच्या अकाऊंटला घालत आहेत. देशातील शेतकऱ्यांना लुटण्याचं पाप ही सरकार करत आहे. त्यामुळे भाजप ही शेतकरी विरोधी आहे. पंतप्रधानांनी राज्यात अनेक सभा घेतल्या पण शेतकऱ्यावर एक शब्दही बोलले नाही, असं नाना पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा!

पुण्यात एका अल्पवयीन मुलाने दोन लोकांना चिरडलं तरी अशा युवकाला जामीन मिळाला आहे. त्याला पिझा बर्गर खाऊ घातला. यावरून असं सिद्ध होत की देवेंद्र फडणवीस हे गरिबांना कुत्रा समजतात. पुण्यात झालेला अपघात हा अपघात नसून माणूस वधाचा गुन्हा आहे व अशा प्रकरणात जामीन मिळालाच कसा त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे.

इंडिया आघाडीच्या 350 सीट निवडून येतील

प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की भाजपाला 330 पेक्षा जास्त सीटा मिळतील यावर नाना पटोले बोलले की प्रशांत किशोर यांना जर जनमत कळत असेल तर त्यांनी निवडणूकीत उभं राहायला पाहिजे होतं. यावेळी लोकांचं जनमत आमच्या सोबत आहेत. त्यामुळे 350 च्या वर आमच्या जागा निवडून येतील.