लेखिका अरुंधती रॉय यांच्या विरोधात ‘यूएपीए’अंतर्गत खटला चालणार

लेखिका अरुंधती रॉय यांच्या विरोधात ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत खटला चालविण्यास मंजुरी मिळाली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी रॉय यांच्या आणि कश्मीर केंद्रीय विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्याविरुद्ध ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत खटला चालवण्यास परवानगी दिली. सुशील पंडित यांनी 2010 मध्ये या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 21 ऑक्टोबर 2010 रोजी दिल्लीच्या कोपर्निकस रोडवरील एलटीजी सभागृहात ‘आझादी-द ओन्ली वे’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या परिषदेत अरुंधती रॉय आणि हुसैन यांच्यावर प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप आहे. परिषदेत ‘कश्मीर हिंदुस्थानापासून वेगळे करा’ असा प्रचार करण्यात आला. कश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडित यांनी 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर रॉय आणि हुसैन यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.