ब्रिटनच्या राजापेक्षाही सुनक श्रीमंत

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. या दांपत्यांच्या संपत्तीत गेल्यावर्षी 122 दशलक्ष पौंड (सुमारे 1287 कोटी रुपये) वाढ झाली होती. श्रीमंतांच्या नव्या यादीमध्ये या जोडप्याची अंदाजे निव्वळ संपत्ती 2024 मध्ये 529 दशलक्ष पौंडवरून 651 दशलक्ष पौंड म्हणजे 6,867 कोटी रुपये झाली आहे. संपत्तीमध्ये झालेल्या भरमसाट वाढीमुळे ऋषी सुनक आता ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत झाले आहेत.

2022 मध्ये ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा जास्त होती. त्या वर्षी एलिझाबेथ यांच्या संपत्तीचे मूल्य 370 दशलक्ष पौंड होते. फेब्रुवारीच्या आर्थिक अहवालानुसार अक्षता मूर्ती यांची कमाई ऋषी सुनक यांच्यापेक्षा जास्त आहे.

 संपत्ती वाढण्याचे कारण

हिंदुस्थानची दिग्गज आयटी पंपनी इन्पहसिसमधील अक्षता मूर्ती यांची हिस्सेदारी जोडप्याच्या संपत्तीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. इन्पहसिसचे मूल्य 70 अब्ज डॉलर असून अक्षता मूर्ती यांचे वडील नारायण मूर्ती पंपनीचे सह-संस्थापक आहेत, तर पंपनीत अक्षता यांचाही मोठा हिस्सा आहे.