भटक्या कुत्र्यापासून स्वतःला वाचवा; पालिका शाळा-कॉलेजमध्ये करणार जनजागृती मोहीम

मुंबईत भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत कमी करण्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. पालिकेच्या शाळा आणि कॉलेजमध्ये ही जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून रात्री दूर दिवसाही भटक्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. काही वेळा कुत्रा अंगावर धावून येण्यामागे मुलांचा खोळसाडपणा कारणीभूत ठरतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांपासून सावध रहावे, काय करावे, काय करू नये याबाबत शाळा, कॉलेज, रेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.