एप्रिल महिन्यात कोकण रेल्वेत सापडले तब्बल 15 हजार फुकटे प्रवासी

कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कोकण रेल्वेने करडी नजर ठेवली आहे. एप्रिल महिन्यात सुटट्यांच्या हंगामात कोकण रेल्वेत तब्बल 15 हजार 129 फुकटे प्रवासी सापडले. या प्रवाशांकडून 2 कोटी 69 लाख 85 हजार 256 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फुकट्या प्रवाशांना चाप बसावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहिम राबवत आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण 15 हजार 129 तिकीट नसलेले फुकटे प्रवासी आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 2 कोटी 69 लाख 85 हजार 256 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे. येणाऱ्या काळात कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरु राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा. सन्मानाने प्रवास करा. तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.