IPL 2024 : विराट कोहली इतिहास रचणार? 29 धावा करताच ‘अस’ करणारा ठरणार पहिला फलंदाज

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने बाजी मारत हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला. या विजयासह आयपीएलच्या अंतिम फेरीत कोलकाताचा संघ चौथ्यांदा दाखल झाला. कोलकाताला भिडण्यासाठी आज (22 मे 2024) बंगळुरु (RCB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) या संघांमध्ये टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीला या सामन्यामध्ये इतिहास रचण्याची संधी आहे.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावार रंगणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हैदराबादशी भिडेल. बंगळुरु आणि राजस्थान यांच्यामध्ये होणाऱ्या या सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्यासाठी अवघ्या 29 धावांची गरज आहे. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 7971 धावा केल्या आहेत. त्यामुळे 8 हजार धावांचा टप्पा पुर्ण करण्यासाठी विराटला अवघ्या 29 धावांची गरज आहे. 29 धावा करण्यात विराट कोहली यशस्वी ठरल्यास आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे.