बेळगावच्या हुलीकट्टी गावात बिरेश्वर-करेम्मा देवी यात्रा, प्रसादातून 46 भाविकांना विषबाधा

बेळगाव येथील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात भरलेल्या बिरेश्वर आणि करेम्मा देवीच्या यात्रेत धक्कादायक घटना घडली आहे. या यात्रेत 46 भाविकांना प्रसादातून विषबाधा झाली असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णांवर सावदत्ती सार्वजनिक रुग्णालय व बेळगावी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी भिरेश्वर आणि करेम्मा यात्रेत प्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांना पोटदुखी, आमांश आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात वैद्यकीय शिबिर उभारण्यात आले असून स्थानिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.