आळंदी नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळला

आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात बुडून मृत्यू झालेल्या एका युवकास इंद्रायणी नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी अधिक तपास करत आहेत.

येथील इंद्रायणी नदी पात्रात एक व्यक्ती बुडाल्याचे आळंदी पोलीस स्टेशनला समजल्याने येथील कर्मचारी यांनी मिळालेल्या माहिती प्रमाणे तात्काळ पोलिसांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून इंद्रायणी नदी पात्रात शोध सुरू केला. यासाठी वन्यजीव रक्षक संस्था, मावळ, अपदा मित्र खेड, अलंकापुरी वन्यजीव प्राणी संघ या तीन टीमने पोलिसांना तसेच मदत कार्यास सहकार्य करीत घटनास्थळी मदतीस धाव घेतली. आळंदी पोलीस आणि मदतीला आलेल्या तिन्ही पथकातील सेवकांचे सहकार्याने पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत देह इंद्रायणी नदी पात्रा बाहेर काढण्यात आला. या घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन करीत आहे.

आळंदी पोलीस स्टेशन येथून पृथ्वीराज पाटील यांनी इंद्रायणी घाटावरती एक मुलगा बुडाला असल्याचे वन्यजीव रक्षक संस्था मावळ, अपदा मित्र खेड, अलंकापुरी वन्यजीव प्राणी संघ यांना कालविण्याने सर्व संस्था तात्काळ मदतीस आल्याची माहिती आनंद वडगावकर यांनी दिली. या वेळी मदतीस धावून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मध्ये निलेश गराडे, विनय सावंत, अविनाश कारले, राहुल देशमुख, विक्रांत चौधरी, भीमा खिलारे, नारायण गायकवाड, राहुल स्वामी, शक्ती लोकरे, आनंद वडगावकर यांचे टीमने उपस्थित राहून मदत केली.