अमेरिकेने बांग्लादेशचा केला पराभव, मुंबईत जन्मलेल्या ‘या’ खेळाडूने केली चमकदार कामगिरी

टी20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व संघ कंबर कसून सराव करत आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेरिका आणि बांग्लादेश या संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 सामन्यात अमेरिकेने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बांग्लादेशचा पराभव केला आहे. या सामन्यात हिंदुस्थानी वंशाचा खेळाडू हरमीत सिंगने तुफान फलंदाजी केली.

टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभुमीवर अमेरिका आणि बांग्लादेश या संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिक सुरू आहे. Prairie View मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या होत्या. बांग्लादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेची सुरुवात मात्र खराब झाली. 94 या धावसंख्येवर अमेरिकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यामुळे बांग्लादेश विजयी होणार हे एक प्रकारे निश्चित झाले होते. मात्र न्यूझीलंडचा माझी खेळाडू कोरी एंडरसन (25 चेंडू 34 धावा) आणि मुंबईत जन्मलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या हरमीत सिंगने (13 चेंडू 33 धावा) सामन्यावर पकड निर्माण केली. या दोघांनी केलेल्या तुफान फलंदाजीमुळे अमेरिकेने बांग्लादेशचा 5 विकेटने पराभव केला. या सामन्यामध्ये हरमीत सिंगला सामनावीराच्या पुरस्कराने गौरविण्यात आले.

हरमित सिंगचा जन्म 7 सप्टेंबर 1992 रोजी मुंबईमध्ये झाला. हरमीत दोनवेळा 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळला आहे. 2012 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला त्या वर्ल्ड कपमध्ये हरमीतने जबरदस्त गोलंदाजी केली होती. तसेच 2009 साली आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळताना हरमीतने 27 सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्या आहेत.