साडेचार महिन्यांत 13 लाख तिकिटांची विक्री; एसटीच्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

नव्या वर्षापासून ऑनलाइन आरक्षण प्रणाली अद्ययावत करून नव्याने सुरू केलेल्या एसटीच्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळतोय. 1 जानेवारी ते 20 मे 2024 पर्यंत 12 लाख 92 हजार इतक्या तिकिटाची विक्री या नव्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली. याच काळात मागील वर्षी 9 लाख 75 हजार तिकिटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे 3 लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज 10 हजार तिकिटे काढली जात आहेत.

प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच श्एRऊण् ँल्s Rाsाrन्atग्दह या अॅपच्या माध्यमातूनदेखील प्रवाशांना तिकीट काढता येते. नवीन वर्षात करण्यात आलेल्या नवीन बदलांमुळे ऑनलाइन आरक्षण प्रणाली वापरण्यास सोपी झाली. ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचेदेखील आरक्षण करण्याची यावर सोय आहे.

येथे करा तक्रारी

ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी 24 तास सुरू असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरूनदेखील तिकिटे न येणे (पेमेंट गेटवेसंदर्भात) या तक्रारींसाठी 0120-4456456 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.