अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात दाखल

अभिनेता शाहरुख खान याला उष्माघाताचा त्रास झाला असून त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.

शाहरुख खानचा आयपीएल मधील संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. हा सामना पाहण्यासाठी व आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खान अहमदाबाद येथे मंगळवारी पार पडलेल्या सामन्याला हजर राहिला होता. या सामन्यानंतर शाहरुखला उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्याला अहमदाबादमधील केड़ी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.