Photo – नारिंगी रंगाच्या ड्रेसमध्ये छाया कदमचा वेगळा अंदाज, पाहा फोटो

बहुचर्चित अशा ‘कान फेस्टिव्हल’ला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री छाया कदम हिने नुकतीच हजेरी लावली. यावेळी तिच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामध्ये तिने आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक केला होता. शिवाय त्या लूकमधील फोटो शेअर करत तिने भावुक पोस्ट लिहिली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता छायाने नारंगी रंगाच्या ड्रेसमधील अनोख्या अंदाजात छानसे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत ‘ऊन ओथंबून येती’ अशी फोटोओळ दिली आहे.