पालकांनो सांभाळा…हवा खराब, मुलांचा मेंदू खराब

वायुप्रदूषणमुळे मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. मुलांचा मेंदू कमकुवत होतो. मुलांची बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता ढासळते. यासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन बार्सिलानो इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी केले आहे.

आयुष्याच्या सुरुवातीला मुलांचा संपर्क नायट्रोजन डायऑक्साईडशी झाला, तर पुढे मुलांची एकाग्रता कमी होते. नायट्रोजन डायऑक्साईड हा प्रदूषणाचा महत्त्वाचा घटक आहे. कार आणि ट्रकच्या वायूप्रदूषणात हा घटक असतो. एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी स्पेनमधील 1703 महिला आणि त्यांच्या मुलांची माहिती गोळा करण्यात आली. मुले नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपका&त किती काळ आली आणि मुलांवर काय परिणाम झाला, यादृष्टीने अभ्यास करण्यात आला.

नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपका&त आलेली मुले चार ते आठ वर्षांच्या वयात कोणत्याही गोष्टीवर नीट लक्ष पेंद्रित करू शकत नाहीत. मुलींपेक्षा मुलांवर याचा प्रभाव जास्त होतो.

प्रदूषण वाढले
वाढते वायुप्रदूषण ही जगासमोरची मोठी समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीवरून या गोष्टीस दुजोरा मिळतो. प्रदूषणाची पातळी जिथे डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा जास्त अशा हवेत जगातील 90 लोकसंख्या श्वास घेते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मुलांचा मेंदू हळूहळू परिपक्व होतो. प्रदूषणासाठी तो जास्त असुरक्षित असतो. प्रदूषणामुळे मुलांच्या विचारक्षमता, आकलनक्षमतेवर परिणाम होतो.

प्रदूषणामुळे केवळ
मुलांना त्रास होत नाही तर वयोवृद्ध व्यक्तींनाही याचे परिणाम भोगावे लागतात.
हिंदुस्थानातील वायुप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. सुमारे 67 लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात. (प्रदूषणाचा स्तर 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक आहे.)