मलाला युसूफजाईचा गाझाला पाठिंबा

 

इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गाझात मानवीय संकट निर्माण झाले. गाझातील लोकांना मदत मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफजाईने गाझाच्या समर्थनार्थ पाठिंबा दिला आहे. गाझावर हल्ला करणाऱया इस्रायलचा युसूफजाई यांनी निषेध केला असून गाझामधील फिलिस्तानींसाठी पाठिंबा दर्शवला. गाझातील लोकांसाठी पाठिंबा देण्यावरून कोणताही भ्रम निर्माण होऊ नये, असे मला वाटते. युद्ध तत्काळ थांबवण्याची गरज आहे. बॉम्बस्पह्ट, भुकेलेली मुले, शाळा बंद हे आता पाहवत नाही, असे मलाला यांनी एक्सवर लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि युद्धासारखा अपराध केल्याप्रकरणी मी इस्रायल सरकारचा निषेध करते आणि करत राहिल, असे मलालाने म्हटले आहे.