जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

बर्फातून काढली वाट

हिमाचल प्रदेशात अजूनही जोरदार बर्फवृष्टी होत असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. हजारो पर्यटक अडकून पडल्यामुळे बर्फ हटवून हस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रचंड बर्फवृष्टीमुळे जागोजागी बर्फ साचले असून पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अक्षरशः व्रेनच्या मदतीने बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे.

 घरी बसूनही काढा रेल्वेचे टिकीट

यूटीएस अॅपसाठी यापूर्वी पाच किलोमीटरची मर्यादा होती. स्टेशनच्या परिसरात पाच किलोमीटरच्या आतच हे तिकीट काढता येत होते. आता ही मर्यादा रद्द करण्यात आली आहे. तुम्ही किती अंतरावर असल्यावरही हे तिकीट काढू शकता. आरक्षण तिकिटासारखे घरी बसून यूटीएसवर जनरल तिकीट काढता येणार आहे. ऑनलाईनच्या जमान्यात प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही. यूटीएस अॅपवरूनही तिकीट काढता येते. यासाठी असणारी पाच किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच या पद्धतीने तिकीट काढल्यास तीन टक्के बोनसही मिळणार आहे.

 कोरोना लसीमुळे त्रास झाला – श्रेयस तळपदे

कोरोनाची लस घेतल्यानंतर मला तुलनेने जास्त थकवा जाणवू लागला होता. कदाचित लसीकरण किंवा कोव्हिडमुळे सुद्धा मला त्रास झाला असेल, हे आपण नाकारू शकत नाही, असे अभिनेता श्रेयस तळपदेने एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याचे हे विधान सध्या चर्चेत आहे.

सरन्यायाधीशांनी खाल्ली होती मास्तरांची छडी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे पाचवी इयत्तेत असताना त्यांना मास्तरांची छडी खावी लागली होती. याबाबतचा किस्सा त्यांनीच एका कार्यक्रमादरम्यान सांगितला. हा कीस्सा मी कधीच विसरू शकणार नाही असे ते म्हणाले. मुलांसोबत आपण जसे वागतो ते मुले आयुष्यभर डोक्यात ठेवतात असेही त्यांनी सांगितले. एका छोटय़ाशा चुकीसाठी मास्तरांनी वेताच्या छडीने मला मारले होते. हातावर जखमा झाल्या होत्या. परंतु, लाज वाटल्याने मी ही गोष्ट 10 दिवस आईवडीलांकडून लपवून ठेवली होती, असे सरन्यायाधीश म्हणाले.

नासाने शेअर केला सूर्यमालेचा डोळे दीपवणारा पह्टो

नासाने नुकतेच सूर्यमालेच्या ग्रहांचे सुंदर पह्टो शेअर केले. यामध्ये शनी, मंगळ आणि पृथ्वीव्यतिरिक्त पेरेडिया ग्रहाचाही पह्टो आहे. पेरेडिया ग्रह सूर्यमालेतील शनी ग्रहासारखा दिसतो. दोन्ही ग्रहांमध्ये खूप साम्य आहे. नासाने इन्स्टाग्रामवर पह्टो शेअर करताना लिहिलंय,  हे पह्टो खूप सुंदर आणि भव्य दिसत आहेत. आपली सूर्यमाला आधी आकाशगंगेच्या रूपात बनली. सूर्यमालेतील ग्रहासारखे पेरेडिया ग्रह आहे. नासाने शेअर केलेल्या ग्रहांच्या पह्टोंवर नेटकरी मोठय़ा प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

सोने 3 हजारांनी स्वस्त 

यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होऊ शकते. कारण त्यापूर्वीच सोन्याने धमाका केला आहे. प्रति 10 ग्रॅमला सोने तब्बल 3,281 रुपयांनी स्वस्त झाले आहे. इराण आणि इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस सोने महाग होत चालले होते. परंतु युद्ध आणखी न लांबवण्याचे संकेत मिळाल़े