हिंदुस्थानचे दोन्ही रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला 4*400 रिले संघाने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी पार केली आहे. ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत पोहोचण्यासाठी या संघांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला होता. पहिल्या राऊंडमध्ये तीन संघांना अपयश आलं. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये दोन्ही संघांनी फेरी पार केली.

यातील महिला संघात रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्रीदांडी आणि शुभा वेंकटेशन यांचा समावेश आहे. त्यांनी 3 मिनिटे 29 सेकंद 35 मिनिसेकंदांत अंतिम रेषा गाठली. तर पुरुष संघात मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जॅकब यांचा समावेश आहे. या संघाने 3 मिनिटे 3 सेकंद आणि 23 मिनीसेकंदांमध्ये अंतिम रेषा गाठली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.