कैसे एप्रिल फूल बनाया…जाणून घ्या यामागील रंजक इतिहास…

एक एप्रिल म्हणजे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात…तसेच या दिवशी एकमेंकाना फसवून त्यांना बकरा बनवायचे म्हणजेच एप्रिल फूल करायचे, अशी प्रथाही अनेक ठिकाणी आहे. मात्र, या विचित्र प्रथेचा उगम आणि इतिहास रंजक आहे.

एप्रिल फूलचा इतिहास कॅलेंडरमधील बदलापासून सुरू होतो. पूर्वीच्या काळी कॅलेंडरमध्ये एप्रिल हा पहिला महिना होता. त्याकाळी 1 एप्रिल रोज नववर्ष साजरे करण्यात येत असे. मात्र, या कॅलेंडरमध्ये अनेक त्रुटी असल्याचे तसेच चांद्रमास आणि सौरमास यांचा ताळमेळ बसत नव्हता. तसेच सणाच्या ऋतुमध्येही बदल होत होते. त्यामुळे कॅलेंडरमध्ये अनेक बदल 1582 मध्ये चार्ल्स पोप ग्रेगोरियन यांनी नवे कॅलेंडर सुरू केले. त्यात जानेवारीपासून नवेवर्ष सुरू होत होते. हा बदल जनतेने स्विकारला नाही. त्यामुळे जनता 1 एप्रिल रोजीच नवे वर्ष साजरे करत होती. त्यामुळे राजाने जो 1 एप्रिल रोजी नवे वर्ष साजरे करेल, तो फूल म्हणजे मूर्ख समजला जाईल, असे फर्मान काढले. तेव्हापासून 1 जानेवारीला नवे वर्ष साजरे होऊ लागले आणि 1 एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून ओळखला जाऊ लागला.

याआधीही हा इतिहास 1381 पर्यंत जातो. ही कथाही रंजक आहे. इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय यांनी बोहेमियाची राणी एनीसोबत साखरपुडा करण्याची घोषणा केली. राज्यात सर्वत्र साखरपुड्याची तयारी करण्यात आली. मात्र. नंतर या सोहळ्याची तारीख 32 मार्च अशी जाहीर करण्यात आली. मात्र, कॅलेंडरमध्ये कोणत्याच महिन्यात 32 दिवस येत नसल्याने राजाने गंमत करत आपल्याला फूल बनवले, असे समजले आणि तेव्हापासून एप्रिल फूलची प्रथा सुरू झाली, असे सांगण्यात येते.

हिंदुस्थानात गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात होते. तर 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. इंग्रज भारतात आल्यानंतप त्यांची कालमापन पद्धती कॅलेंडर स्वीकारल्यानंतर देशातही 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फूलची प्रथा सुरू झाली. आता सोशल मिडीयामुळे याची व्याप्ती वाढत आहे. सोशल मिडीयावर याबाबतचे अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.