एकीकडे धनशक्ती, तर दुसरीकडे जनशक्ती; गद्दार उल्लेख करत यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून महाराष्ट्रामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात 8 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत असून यात अमरावतीचाही समावेश आहे. येथे भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत आहे. तर आमदार बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बूब यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

Lok Sabha Election 2024 Voting Update – महाराष्ट्रामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान

अमरावतीमध्ये सकाळपासून मतदानालासाठी रांगा लागल्या आहेत. सामान्य लोकांसह लोकप्रतिनिधींनीही रांगेमध्ये उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मोझरी या मूळगावी जाऊन आई पुष्पमाला, काला राजीव आणि मुलगी आकांश यांच्यासह मतदान केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली.

मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक असून एकीकडे धनशक्ती, तर दुसरीकडे जनशक्ती आहे. 2019मध्ये ज्यांना आम्ही निवडून दिले त्यांनी धोका दिला. त्या गद्दार आता पुन्हा निवडणुकीत उभ्या आहेत, अशी टीका नाव यशोमती ठाकूर यांनी केली. तसेच अमरावतीतून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वऱ्हाडी ‘वेटिंग’वर, तर नवरदेव ‘वोटिंग’ सेंटरवर; मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला निघाली वरात