112 वर्षे जुने टायटॅनिकचे मेन्यू कार्ड व्हायरल

प्रसिद्ध जहाज टायटॅनिकला अपघात होऊन 112 वर्षे उलटली आहेत. तरीही हे जहाज पुनः पुन्हा चर्चेत येते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध टायटॅनिक जहाजावरील भोजनाचे मेन्यू कार्ड व्हायरल करण्यात आले आहे. हे मेन्यूकार्ड 112 वर्षे जुने आहे. हे मेन्यू कार्ड जहाजातील फर्स्ट आणि थर्ड क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आले होते. यात चिकनपासून ब्रेडपर्यंतचं ऑप्शन आहे. सोशल मीडियावर फेसिनेटिंग नावाच्या अकाऊंटवर हे मेन्यूकार्ड शेअर करण्यात आले. मेन्यकार्डला शेअर करताना कॅप्शन लिहिले की, टायटॅनिकला बुडण्याच्या एक दिवस आधी 14 एप्रिल 1912 चे टायटॅनिक फर्स्ट क्लास वि. थर्ड क्लास मेन्यू. या मेन्यूकार्डमध्ये दूध, बटाटे, अंडे, ब्रेड, मक्खन, चहा, कॉफीसारखे ऑप्शन दिसत आहे. या पोस्टला आतापर्यंत 1.2 मिलियन लोकांनी पाहिले आहे.