धूर-धुळीमुळे मुंबईत प्रदूषण

वाहनांतून बाहेर पडणारा हानिकारक धूर आणि हवेत मिसळणारी रस्त्यांवरची धूळ मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय जर्नलच्या अभ्यासात म्हटले आहे. याशिवाय ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे आणि जाळला जाणारा घनकचरा ही विषारी पीएम 10 साठी प्रमुख प्रदूषके आहेत. मुंबईत गाडय़ांची संख्या दोन दशकांत सुमारे तीनशे टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये 35 टक्के वाहने 15 वर्षे जुनी आहेत, अशी धक्कादायक माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. मुंबई 44 गिगाग्रॅम उत्सर्जन होतंय, तर दिल्लीत 80 गिगाग्रॅम उत्सर्जन होतंय.