आक्षेपार्ह फोटो नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत बलात्कार; आरोपी गजाआड

विवाहितेसोबतचे आक्षेपार्ह पह्टो नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनीट-5च्या पथकाने पकडले. गुन्हा दाखल होण्याआधी आरोपी पसार झाला होता. तो चुनाभट्टी येथे सापडला.

आरोपी आणि तक्रारदार महिला दोघेही वरळी परिसरात राहत असून एकमेकांचे ओळखीचे आहेत. आरोपीने विवाहितेच्या नकळत तिचे चुंबन घेतानाचा सेल्फी काढून ते पह्टो नातेवाईकांना दाखवीन असे धमकावले. तसेच आणखी आक्षपोर्ह पह्टो मोबाईलवर काढले व ते पह्टोही दाखवीन असे धमकावत विवाहितेवर बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या पतीला समजल्यानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आपल्याविरोधात गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आरोपीने पळ काढला. तो लपून राहत होता. दरम्यान, युनीट-5 गुह्याचा संमातर तपास करू लागली. अखेर आरोपी चुनाभट्टी परिसरात लपून राहत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तेथे जाऊन त्याला पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला दादर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.