एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित एमसीए प्रेसिडेंट चषक क्रिकेट स्पर्धेत सी अॅण्ड डी डिव्हिजनमध्ये माटुंगा जिमखान्याने बाजी मारली. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात रविवारी त्यांनी घाटकोपर जॉली जिमखान्यावर 7 विकेट राखून विजय मिळवला. माटुंगा जिमखान्याने नाणेफेक जिंकून घाटकोपर जॉली जिमखान्याला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. त्यांनी 20 षटकांत 5 बाद 148 धावा केल्या. त्यात डावखुरा फलंदाज साहिल जाधवच्या सर्वाधिक 42 धावा होत्या. माटुंगा जिमखान्याने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान 19.3 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. राज गोहिलने 45,  डावखुऱया बिपीन वाघेलाने 36 आणि एहसान अमीनने 31 धावा करताना विजयात मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक ः सी आणि डी डिव्हिजन (अंतिम फेरी)ः घाटकोपर जॉली जिमखाना ः 20 षटकांत 5 बाद 148(साहिल जाधव 42, कुणाल गावंड 4-0-34-3) वि. माटुंगा जिमखानाः19.3 षटकांत 3 बाद 149(राज गोहिल 45, बिपिन वाघेला 36, एहसान अमीन 31).