राम मंदिर अभिषेक सोहळा झाल्यानंतर अयोध्यानगरी उद्या पहिल्यांदाच मतदानाला सामोरी जात आहे. या मतदानासाठी अयोध्यावासीयांची तयारी सुरू असताना, शहरातील मुस्लिम मतदारांना ‘मंदिर-मशिद’ वादाशी काहीही देणेघेणे नाही. रोजगार आणि विकास हे त्यांच्यासाठी प्राधान्याचे मुद्दे आहेत.
निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना देव आठवतो. नेते कोणत्याही पक्षाचे असोत, देवाचे स्मरण करू लागतात. पण लोकांना आरोग्य, शिक्षण सुविधा आणि सुरक्षा हवी असते, असे अन्सारी यांनी सांगितले. मला निवडणुकीमध्ये फारसा रस नसला तरी, मी मतदानाच्या दिवशी नक्कीच मतदान करेन, असे ते म्हणाले. हरयाणाच्या गोहाना येथे शनिवारी झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इक्बाल यांचा उल्लेख केला होता.
लोकांना रोजगार हवे आहेत…
अयोध्येतील जनता समाधानी असल्याचे चित्र उभे करण्यात येत असले तरी प्रत्येक जण याच्याशी सहमत नाही. 25 वर्षीय मोहम्मद आमिर म्हणाला की, लोकांना ‘मंदिर-मशिद’मध्ये रस नाही आणि त्यांना नोकऱया हव्या आहेत. आम्हाला नोकऱया हव्या आहेत. ‘मंदिर-मशिद’ या प्रश्नाने आमची घरे चालणार नाहीत. मी मुस्लिम आहे म्हणून हे बोलत नाही, मी बेरोजगार म्हणून म्हणत आहे. ‘मंदिर-मशिद’ हा निवडणुकीचा मुद्दाच नसावा, असे मोहम्मद म्हणाला.
विकास कुठे आहे?
अयोध्येतील निवडणुकीच्या रिंगणातील एकमेव मुस्लिम उमेदवार फरीद सलमानी यांनी विकास कुठे आहे, असाच प्रश्न विचारला. मतदारसंघाच्या बाहेरील भागात राहणाऱया लोकांचे जीवन विकासापासून अस्पर्श राहिले आहे. माझ्या लहानपणापासून मतदारसंघाच्या बाहेरील भागात, विशेषतः खेडय़ातील गोष्टी कमी-अधिक प्रमाणात आहेत तशाच राहिल्या आहेत. जवळपास प्रत्येक जातीचे खासदार आणि आमदार इथून निवडून आले आहेत, परंतु विकास अद्याप अनेक भागात पोहोचलेला नाही, असे सलमानी म्हणाले. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदान होणार आहे.