पाकव्याप्त कश्मीर परत घेऊच; अमित शहा यांचा सुका दम

पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचे आहे आणि आम्ही ते परत घेऊ, असा सुका दम पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिला. चीनच्या घुसखोरीला, दादागिरीला रोखू न शकणारे मोदी, शहा आणि भाजप सध्या निवडणुकीच्या राजकारणासाठी पाकिस्तानला सुका दम देऊन जनतेचे मनोरंजन करत आहेत.

प्रयागराजमध्ये शहा यांनी तेच केले. हे पीओके आमचे आहे, आमचेच राहील आणि आम्ही ते परत घेऊ, असे ते राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले.