संसदेच्या दोन्ही इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे; 3 हजार 317 जवान करणार तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्यावर्षी 13 डिसेंबर रोजी नवीन संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्यानंतर आता संसदेच्या नव्या आणि जुन्या इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सीआयएसएफ अर्थात पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली आहे. 20 मेपासून संसदेच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे तब्बल 3 हजार 317 तैनात करण्यात येणार आहेत.

संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या पार्लमेंट डयुटी ग्रुपने 17 मे रोजी आपल्या 1400 सैनिकांनाही परत बोलावून घेतले आहे. त्यांची सर्व वाहने, शस्त्र आणि कमांडोही काढून घेण्यात आले आहेत. सीआरपीएफ कमांडर डीआयजी दर्जाच्या अधिकाऩयाने संसदेच्या सुरक्षेशी संबंधित सर्व माहिती तसेच शस्त्र सीआयएसएफकडे सोपवली आहेत. त्याचबरोर 150 दिल्ली पोलिस कर्मचारी आणि संसद सुरक्षा कर्मचायांनी संयुक्तपणे केलेले संसदेचे संरक्षणही काढून घेण्यात आल्याची माहिती सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सीआरपीएफचा जवान भावूक
17 मे रोजी संसद परिसर सोडताना सीआरपीएफचे जवान भाऊक झाले होते. निघण्यापूर्वी या जवानांनी देशातील लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसद भवनाच्या रक्षणाची जबाबदारी लक्षात ठेवण्यासाठी पह्टो आणि सेल्फी काढले. 2001 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी इतर सुरक्षा यंत्रणांसह दहशतवाद्यांचा धैर्याने मुकाबला केला होता. या घटनेत सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. काहींना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दहशतवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण दिले
सीआयएसएफचे जवान गेल्या 10 दिवसांपासून दहशतवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण घेत होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या ब्लॅक कमांसोबतही संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. सीआएसएफ जवानांना प्रवेशद्वारावर लोकांची तपासणी करणे, साहित्य तपासणे, बॉम्ब शोधणे आणि निकामी करणे, दहशतवादी हल्ल्यांवर त्वरित कारवाई करणे, स्नायपरचे प्रशिक्षण आणि संसदेत येणाऱया लोकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

– 13 डिसेंबर 2023 रोजी नवीन संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्यानंतर संसद परिसराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. यानंतर सीआयएसएफचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.