बूट व्यापाऱयाकडे 60 कोटींचे घबाड

 

बूट व्यावसायिक असलेले हरमिलाप ट्रेडर्सचे रामनाथ डंग यांच्या जयपूर येथील घरावर आयकर अधिकाऱयांनी छापा टाकला. या छापेमारीमध्ये 60 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. एवढी मोठी रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले. रोकड मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आल्या.

शनिवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने तीन बूट व्यावसायिकांच्या 12 ठिकाणांवर धाड टाकली. आयकर विभागाची टीम जयपूर हाऊसमधील हरमिलाप ट्रेडर्सच्या रामनाथ डंग यांच्या निवासस्थानीही पोहोचली. या वेळी घरातून  60 कोटी रुपये जप्त केले आहेत. आयकर विभागाच्या टीममधील अधिकाऱयांनी आधी हाताने पैसे मोजणी केली, त्यानंतर नोटा मोजण्याच्या काही मशीन्स मागवण्याचे आदेश देण्यात आले.  रात्री 10.30 वाजेपर्यंत दहाहून अधिक मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. अनेक नोटा 500 रुपयांच्या होत्या. या छापेमारीचे काही पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पह्टोमध्ये बेडवर कोटय़वधींची रोख रक्कम दिसत आहे.