मोदींना मत देऊ नका सांगणाऱ्या शिक्षकाला अटक

बिहारच्या सरकारी शाळेतील हरेंद्र रजक या शिक्षकावर वर्गात ‘मोदींना कोणीही मत देऊ नये’ असे सांगितल्याने तुरुंगात जाण्याची वेळ ओढवली आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर राजकवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कुऱ्हानी ब्लॉकमधील अमरख येथील सरकारी माध्यमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी राजकचे वर्तन शिक्षणाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. रेशन योजनेंतर्गत खाण्यास अयोग्य अन्नधान्य वाटप केले जात असल्याने कोणीही मोदींना मतदान करू नये, असे राजकने मुलांना सांगितले होते.