दहावीच्या परीक्षेला महागाईची झळ, बोर्डाने परीक्षा शुल्कात केली वाढ

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱया दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. परीक्षा शुल्काचे सुधारित दर शिक्षण मंडळाने जारी केले आहेत.

खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क आता 1210 रुपये असणार आहे, तर परीक्षा शुल्क 470 रुपये आकारण्यात येणार आहे. रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 470 असेल, तर प्रशासकीय शुल्क व गुणपत्रिका शुल्क प्रत्येकी 10 रुपये घेतले जातील. शास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 10 रुपये आणि तंत्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. श्रेणी सुधार योजनेसाठी प्रविष्ट होणाऱया विद्यार्थ्यांसाठी 930 रुपये आकारण्यात येतील.