स. का. पाटील उद्यान दुरुस्तीसाठी किती वेळा बंद ठेवणार? आमदार, नगरसेवकावर गिरगावकरांचा आरोप    

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगावमधील मुंबई महापालिकेचे स. का. पाटील हे उद्यान गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या उद्यानाची आतापर्यंत दोन वेळी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दुरुस्तीवरून गिरगावकरांच्या मनात शंका असून स्थानिक नगरसेवक आणि आमदारांच्या सांगण्यावरून हे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे, असा आरोप गिरगावकरांनी केला आहे.

गिरगावचे स. का. पाटील हे निसर्गरम्य उद्यान गेल्या 60 वर्षांपासून स्थानिकांच्या घरात मन करून राहिलेले आहे. या सुंदर उद्यानात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अध्ययन वाटिका (अभ्यासिका), लाफ्टर्स क्लब, आजी-आजोबा बाग, वृद्धांसाठी वॉकर्स बाग तसेच मनोरंजनासाठी खुले रंगमंच तसेच स्केटिंग पार्प आणि पुटुंबसखीसारखे उपाहारगृह अनेक वर्षांपासून स्थानिकांच्या सेवेत आहे, मात्र स्थानिक माजी नगरसेवक आणि आमदारांच्या सांगण्यावरून दुरुस्तीच्या नावाखाली हे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही स्थानिकांच्या होणाऱया गैरसोयीकडे हे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. उद्यान सुरू करून स्थानिकांची गैरसोय दूर करावी नाही तर विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून गिरगावकर आपला विरोध दाखवून देतील, असा इशारा शिवसेनेचे पुलाबा विधानसभेचे समन्वयक अॅड. उदय बने यांनी दिला आहे.