युझवेंद्र चहल 350 विकेट घेणारा पहिलाच हिंदुस्थानी

हिंदुस्थानचा स्टार आणि राजस्थानचा यशस्वी फिरकीवीर युझवेंद्र चहलने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला बाद करून आपल्या टी-20 क्रिकेटच्या कारकीर्दीत 350 वा विकेट मिळवला. तो अशी कामगिरी करणारा पहिलाच हिंदुस्थानी गोलंदाज ठरला आहे. हिंदुस्थानकडून आतापर्यंत पीयूष चावला (310) आणि रविचंद्रन अश्विन (303) या दोन गोलंदाजांनीच 300 पेक्षा अधिक विकेट टिपले आहेत. चहलने गेल्याच आठवडय़ात आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट टिपण्याचा पराक्रम करताना 200 विकेटचा टप्पाही गाठला होता. मात्र टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट टिपण्याचा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या (625) नावावर आहे तर चहल या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. राशीद खान (572), सुनील नारायण (549) आणि इम्रान ताहीर (502) या गोलंदाजांनी 500 पेक्षा अधिक टी-20 विकेट मिळवले आहेत. मात्र टॉप टेन गोलंदाजांच्या यादीत अद्याप एकही हिंदुस्थानी गोलंदाज नाही.