रशिया-युक्रेन युद्धात ढकलणाऱ्या चौघांना अटक

 

रशिया-युव्रेन युद्धात हिंदुस्थानी नागरिकांची फसवणूक करून त्यांना रशिया-युव्रेन युद्धात ढकलणाऱया चार आरोपींना सीबीआयने अटक केली. यातील तीन जण हे हिंदुस्थानातील आहेत, तर एकजण रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारा अनुवादक आहे. त्याला 24 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, आता ही माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरुण आणि येसुदास हे तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. अँथनी एलांगोवन हे मुंबईचे, तर निझिल जोबी बेन्सम हे रशियन संरक्षण मंत्रालयाचे आहेत. हे सर्व लोक एका नेटवर्कचा भाग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुस्थानी लोकांना नोकरी आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होते.