अवघ्या 12 धावांत खेळ खल्लास! जपानचा 205 धावांनी महाविजय

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत असतो. हाच प्रत्यय बुधवार, 8  मे रोजी) मंगोलिया व जपान यांच्यातील आंतरराष्ट्रीय लढतीच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा बघायला मिळाला. या लढतीत मंगोलियाच्या संघाचा अवघ्या 12 धावांत खेळ खल्लास झाला, तर जपानने तब्बल 205 धावांनी महाविजय मिळविला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील जपानचा हा चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय ठरला. याचबरोबर मंगोलियाची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱया क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली आहे. कारण याआधी स्पेनने 2023 मध्ये ऑइल ऑफ मान या संघाला अवघ्या 10 धावांत गुंडाळले होते. आजच्या सामन्यात जपानकडून मिळालेल्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलियाचा 8.2 षटकांत केवळ 12 धावांवर खुर्दा उडाला. या लढतीत त्यांचा तब्बल सात फलंदाजांना भोपळाही पह्डता आला नाही. तुर सुमया हा सर्वाधिक 4 धावा करणारा फलंदाज ठरला, तर त्यानंतर अवांतर 3 ही दुसऱया क्रमांकाची धावसंख्या ठरली. नसमराई बॅट यालल्टने 2, तर एनख एर्डीनने 1 धाव केली. जपानकडून काधुमा काटो स्टॅपर्ह्डने सर्वाधिक पाच फलंदाज बाद केले. अब्दुल सामद व माकोटो तानियामा यांनी 2-2 विकेट टिपले, तर बेंजामिन इटो डेव्हिसने एक विकेट घेतली.

त्याआधी, नाणेफेकीचा काwल जिंपून प्रथम फलंदाजी करताना जपानने 7 बाद 217 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सबोरिश रविचंद्रनने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. याचबरोबर कर्णधार पेंडल कडोवाकी प्लेमिंगने 32, इब्राहिम ताकाहाशीने 31 धावांची, तर बेंजामिन इटो डेव्हिसने 21 धावांची खेळी केली. याचबरोबर जपानला 31 धावांचा अवांतर खुराक मिळाल्याने त्यांना 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. मंगोलियाकडून झोलजावखलान शुरेंटसेटसेगने तीन, लुव्हसानझुंडूई एर्डेनेबुलगनने दोन फलंदाज बाद केले. न्यांबतार नरांबतार व ऑड लुटबयार यांनी एक-एक विकेट घेतली.