अस्साद वाला पुन्हा पापुआ न्यू गिनीचा कर्णधार; आयर्लंडनेही केला संघ जाहीर

दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या पापुआ न्यू गिनी या नवख्या संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा अस्साद वालाकडे सोपविण्यात आले आहे. 2021 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही तोच कर्णधार होता. तसेच आयर्लंडचे कर्णधारपद पॉल स्टार्ंलगकडे दिले आहे.

येत्या 2 जूनपासून विंडीज आणि अमेरिकेत क्रिकेटचा टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत पापुआ न्यू गिनी ‘क’ गटात खेळत आहे तर आयर्लंड ‘अ’ गटात आपला खेळ दाखवणार आहे. यंदा 20 संघ खेळत असून त्यापैकी आतापर्यंत 15 देशांनी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेदरलॅण्डस् आणि श्रीलंका या पाच संघांनी आपले संघ अद्याप जाहीर केलेले नाहीत.

 पापुआ न्यू गिनी

अस्साद वाला (कर्णधार), सेसे बाऊ, किपलिन डोरिगा, हीरी हीरी, लेगा सियाका, टॉनी उरा, चार्ल्स अमिनी (उपकर्णधार), सेमो कामिया, जॉन करिको, कबुआ मोरिया, अलेई नाओ, चाद सोपर, नॉर्मन वानुआ, जॅक गार्डनर, हिला वेअर.

आयर्लंड

पॉल स्टार्ंलग (कर्णधार), रॉस अदायर, अॅण्डी बॉलबर्नी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्पन टकर, मार्प अदायर, कर्टिस पॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्युम, जोश लिटल, बॅरी मॅककर्थी, बेन व्हाइट, व्रेग यंग.