सीईटीच्या तारखांमध्ये पुन्हा बदल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. सीईटी सेलने विधी 5 वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यासह आठ अभ्यासक्रमांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. तर पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर केले आहे. आर्क सीईटीची परीक्षा 12 मे रोजी होणार आहे. बीए/बीएससी, बीएड (4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी परीक्षा 17 मे रोजी होणार होती. ती आता 24 मे रोजी होणार आहे तसेच एलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा 17 मे रोजी होणार होती. आता नव्या तारखांनुसार ती 22 मे रोजी होणार आहे. बी. एस्सी नार्ंसगची सीईटी 18 मेऐवजी आता 28 मे रोजी होणार आहे. बीएचएमसीटी सीईटीची 22 मेची परीक्षा 24 मे रोजी तसेच बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी परीक्षा 29 मे, डीपीएन/पीएचएन सीईटी आणि एम प्लॅनिंग सीईटी परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊनच परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.