शिवडीत 20 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; एका तस्कराला अटक

शिवडी परिसरात एमडीचा साठा विकण्यासाठी घेऊन आलेला एक ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनीटच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला पकडून  20 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम एमडी हस्तगत केले.

शिवडी परिसरात एक ड्रग्ज तस्कर एमडी विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची खबर वरळी युनीटला मिळाली. त्यानुसार पथकाने शिवडीत सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाला उचलले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 100 ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला. त्यामुळे त्याला पकडण्यात आले. हा एमडी त्याने कुठून आणला आणि कोणाला विकणार होता याचा आता पोलीस तपास करीत आहेत.