विशेष: जग बदलणारी पुस्तकं

>> शशिकांत सावंत

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुस्तकांचं विश्व समजून घेताना समाजातील विचारांची, प्रवाहांची समीकरणं समजून घेत जग बदलणाऱया पुस्तकांविषयी जाणून घ्यायला हवं.

चांगले वाचक आणि संग्राहक यांना वैविध्यपूर्ण वाचनाची ओढ असते. ‘बुक्स ऑन बुक्स’ या पुस्तकांप्रमाणेच यात जगावर मोठा परिणाम करणाऱया पुस्तकांचाही समावेश होतो. ‘जग बदलणारी पुस्तकं’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 8-10 तरी पुस्तकं आहेत. मेलविन ब्रॅगचं ‘12 बुक्स दॅट चेंजड् द वर्ल्ड’ हे त्यातलं महत्त्वाचं पुस्तक. ब्रॅगने आधी इंग्रजी भाषेच्या इतिहासाचं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ‘टाइम्स’ साप्ताहिकाला 75 वर्षे झाली तेव्हा त्यांनी जग बदलणाऱया पुस्तकांची यादी केली. त्यात ‘डायरी ऑफ अॅने फ्रँक’ आणि ‘ऑटोबायोग्राफी ऑफ माल्कम एक्स’ ही पुस्तके होती. माल्कम एक्सने कित्येक कोटी असणाऱया कृष्णवर्णीय समुदायाला आवाज दिला. ‘ब्लॅक पँथर’सारखी अमेरिकेत चळवळ सुरू झाली.

‘डायरी ऑफ अॅने फ्रँक’ तर आबालवृद्धांना माहीत आहे. एक छोटीशी मुलगी हिटलरच्या तावडीतून सुटण्यासाठी लपून राहते आणि डायरी लिहिते. तिचे कित्येक नातेवाईक मारले जातात. पण तिच्या रूपाने जगभर हिटलरने केलेल्या ज्युईश लोकांच्या नरसंहाराची कहाणी पोहोचते. ती जणू काही अशा अभागी, आबालवृद्ध मुलांचा आवाज बनते. वर्षानुवर्षे ही दोन्ही पुस्तकं तडाखेबंद खपावर आहेत. जग बदलणाऱया पुस्तकांच्या यादीत कार्ल मार्क्स याचं ‘कॅपिटल’ आणि ‘कम्युनिस्ट मॅन्युफॅस्टो’ याचा समावेश होतोच. किंबहुना कम्युनिस्ट मॅन्युफॅस्टोचे अनुवाद जिथे जिथे झाले. तिथे तिथे कम्युनिझम पोहोचला. असं प्रतिपादन एरिक हॉब्जवाम या डाव्या इतिहासकाराने केलेला आहे. हॉब्जवाम यांची जगाच्या इतिहासाची ‘एज ऑफ रिव्होल्युशन’, ‘एज ऑफ कॅपिटालिझम’, ‘एज ऑफ एक्सट्रीम्स’ ही पुस्तकेदेखील या यादीत समाविष्ट करावी लागतील. पण यांचा जग बदलणाऱया पुस्तकांपेक्षा जग समजून घेणाऱया पुस्तकात समावेश करणे अधिक योग्य होईल.

टाइम्सच्या यादीत ‘प्रिन्सिपिया मॅथमॅटीका’ हे आयझॅक न्यूटनचं पुस्तक आहे. या निवडीबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही. 1687 साली न्यूटनने हा ग्रंथ लिहिला तो लॅटिनमध्ये. त्याचा इंग्रजीत अनुवाद होण्यासाठी 40-50 वर्षे जावी लागली. न्यूटन हा एक गरीब विधवेचा मुलगा. न्यूटनने केंब्रिज विद्यापीठात जावं असा त्याच्या मामाने आग्रह धरला. न्यूटन गरीब होता. त्यामुळे काम करत शिक्षण घ्यावे लागत असे. तिथे केंब्रिजजवळ वसलेल्या एका जत्रेत त्याला दुर्बीण आणि लोलक मिळाला आणि त्याने त्याचंच नाही तर जगाचं नशीब पालटून टाकलं. त्यातून त्याने प्रकाशाचा अभ्यास केला, सातही रंग पांढऱया रंगात मिसळलेले असतात हे शोधलं. तसेच प्रकाशाचं विकिरण कसं होतं हे मांडलं. हळूहळू त्याचं गणित मांडून तो ‘प्रिन्सिपिया ऑफ मॅथेमॅटिक्स’पर्यंत पोहोचला. मृत्यूनंतर आजपर्यंत जवळपास 400 वर्षे न्यूटन वैज्ञानिकांच्या, अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे.

न्यूटननंतर तितकाच विद्वान आणि जग बदलणारा माणूस म्हणजे कार्ल मार्क्स. त्याचा जन्म ज्युईश कुटुंबात 1818 साली झाला. त्याने पीएचडी केली, पण त्याला प्राध्यापकी काही मिळेना. 1842 च्या सुमारास त्याने एका मासिकात एक लेख लिहिला. त्याच मासिकात फ्रेडरिक एंजल्सचाही लेख होता. दोघांचीही मैत्री झाली. एंजल्सचा जो लेख होता तो पॉलिटिकल इकॉनॉमिकबद्दल. तोपर्यंत मार्क्सला अर्थशास्त्रात फारशी गती नव्हती आणि रसही नव्हता. मग दोघे दहा दिवस भेटले, एकत्र राहिले. मँचेस्टरच्या धनाढय़ व्यापाऱयाचा एंजल्स हा मुलगा, पण त्याला ाढांती करायची होती. दोघांनी मिळून भरपूर वाचन एकत्रित केलं आणि लेखनही. दोघांनी मिळून 1848 साली ‘कम्युनिस्ट मॅन्युफॅस्टो’ लिहिला. तो अजरामर ठरला.

नंतर अर्थशास्त्र मार्क्सने बरंच लिहिले आणि ‘कॅपिटल’ गृहतग्रंथ लिहायला घेतला. तो तीन भागात प्रकाशित व्हायचा होता. कार्ल मार्क्सच्या जिवंतपणी फक्त त्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर दुसरा भाग आणि तिसरा भाग एंजल्सने जुळवून प्रकाशित केला. मार्क्स गेला तेव्हा मृत्यूसमयी दफनविधीला केवळ अकरा माणसं हजर होती. पण नंतर दोन तृतीयांश जगावर मार्क्सने प्रभाव टाकला आणि आजही रशिया, चीन दोन्ही महासत्ता आणि काही छोटे-मोठे देश कार्ल मार्क्सची धारणा बाळगून आहेत.

यात समाविष्ट असलेले वेगळे पुस्तक म्हणजे म्हणजे ‘मॅरिड लव्ह.’ मेरी स्टोप्स या बाईने 1918 साली पुस्तक लिहिलं. म्हणजे जवळपास 105 वर्षांपूर्वी. या पुस्तकात ती लिहिते, माझ्या स्वतच्या संसारात लैंगिकतेविषयी माहिती नसल्यामुळे मला खूप दुःख सहन करावं लागलं. माझ्या दुःखातून जे काही मी शिकले ते मानवजातीच्या हितासाठी मांडलं पाहिजे असं मला वाटतं. लग्न झालेल्या स्त्राr-पुरुषांनी सेक्समधील आनंद कसा घ्यावा, स्त्राrलाही लैंगिक आनंदाचा हक्क आहे, इत्यादी मुद्दे तिने मांडले. आजही या गोष्टी लोकांना खटकतात. 105 वर्षांपूर्वी साहजिकच हे पुस्तक खळबळजनक ठरलं. पण जवळपास लाखो लोकांनी ते वाचलं आणि इतकंच नव्हे, तर मेरी स्टॉप्सने आंतरराष्ट्रीय संघटना काढली. जी लॅटिन अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इथपर्यंत अर्धा कोटी लोकांचं कौन्सिलिंग करत असे.

या पुस्तकात ‘रुलबुक ऑफ अमेरिकन फुटबॉल’ या पुस्तकाचाही समावेश आहे. ही बाब लोकांना धक्कादायक वाटू शकेल. पण अमेरिकन फुटबॉलचा जो प्रसार अमेरिकेत आहे तो पाहता त्याची नियमावली तयार करणारे पुस्तक हे अमेरिकेवर प्रभाव टाकणारं पुस्तक ठरलं. 1863 साली ते प्रसिद्ध झालं.

‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’ चार्ल्स डार्विनचे 1859 मधील पुस्तक. त्याअगोदर वॉलेससारख्या अनेक शास्त्रज्ञाने या सिद्धांतावर काम केलं आहे. पण चार्ल्स डार्विनने उपांती विषयीचा सिद्धांत काटेकोरपणे मांडला. ‘सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट’ हा शब्द डार्विनच्या पुस्तकात नव्हता. नंतर त्याच्या टीकाकारांनी तो टाकला आणि प्रसिद्ध झाला. डार्विनच्या सिद्धांतावर टीका करणारे लोकही बरेच आहेत. पण आता शेकडो वर्षांच्या संशोधनानंतर उपांतीविषयक पुरावे समोर येत आहेत.

या यादीतील महत्त्वाचे पुस्तक म्हणजे बायबल. कुराण आणि भगवद्गीता हे दोन्ही ग्रंथ हजारो वर्षे जवळपास शेकडो कोटीच्या लोकसंख्येवर प्रभाव टाकून आहेत, पण यामधील ‘टेक्स्ट’ फारसं बदललं गेलं नाही. उलट मौखिक परंपरा नसल्यामुळे लिखित स्वरूपाच्या बायबलच्या अनेक प्रती होत्या. याचे एकच स्वरूप असावे याकरता सोळाव्या शतकात किंग जेम्सने 54 अभ्यासकांची समिती नेमली आणि 1616 मध्ये बायबल तयार झालं. ज्याला ‘किंग जेम्स व्हर्जन’ असं म्हणतात. विल्यम टॅंडेलने केलेला बायबलचा अनुवाद लोकप्रिय होता, पण चर्चला तो मान्य झाला नाही. विल्यम टॅंडेलला लाकडाच्या चितेवर जिवंत जाळण्यात आलं. त्यानंतर 1911 सालचं 54 विद्वानांनी तयार केलेलं बायबल आज सर्वमान्य आहे. लॅटिन बायबल, ग्रीक बायबल अशा जवळपास वीस बायबलमधून ते संपादित करण्यात आले आहे. गेल्या 40-50 वर्षांत एन.के.एस.पी. म्हणजे न्यू किंग जेम्स व्हर्जन लोकप्रिय आहे, जे आताच्या इंग्रजीत आहे.

या पुस्तकांमध्ये ‘मॅगना चार्टा 1215 इंडिकेशन ऑफ ब्राईट ऑफ वुमन’, ‘1792 मेरी वॉर्स ाढाफ्ट आणि एक्सपेरिमेंट रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी’चे तीन खंड 1839, 1844 आणि 1855, ‘इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नॅशनल’ हा अॅडम्स स्मिथचा ग्रंथ आणि सगळ्यात वरताण म्हणजे विल्यम शेक्सपिअरचा ग्रंथ ज्याच्यामुळे शेक्सपिअर जगभरात पोहोचला ते पुस्तक म्हणजे ‘विल्यम शेक्सपिअरच्या 38 नाटकांचा संच’ अशा महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे. यात अजूनही कितीतरी पुस्तकांची भर टाकता येईल, पण तूर्तास ही काही महत्त्वाची पुस्तकं. अर्थात अशी आणखीही बरीच पुस्तकं आहेत आणि अशा याद्या कधीच परिपूर्ण नसतात.