भावाने केली भावाची हत्या 

घर पुनर्वसनाकरिता देण्याच्या वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली. सुबोध सावंत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक सावंतला मेघवाडी पोलिसांनी अटक केली.

सुबोध हा जोगेश्वरी पूर्व येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. जेथे तो राहत होता, त्या चाळीचा पुनर्विकास होणार आहे. ते घर सुबोधच्या आईच्या नावावर होते. पुनर्विकासात त्यांना नवीन घर मिळणार होते. विकासकाने रहिवाशांना घर खाली करण्यास सांगितले होते. घर पुनर्विकासाला देण्यास सुबोधचा विरोध होता. त्यावरून त्याचे आईसोबत भांडण होत असायचे.

मंगळवारी दीपक आणि सुबोध यांचा वाद झाला. दीपकने सुबोधच्या डोक्यात टणक वस्तू मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सुबोधला मृत घोषित केले. याची माहिती समजताच मेघवाडी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून दीपकला अटक केली.