Tamanna Bhatia – संजय दत्तनंतर महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला समन्स

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला समन्स बजावला आहे. तमन्नाला फेअरप्ले अॅपवरील आयपीएल 2023च्या अवैध स्ट्रीमिंगसंदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. या स्ट्रीमिंगमुळे वायकॉमला कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सायबर सेलने 29 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटीया हिने फेयरप्लेचे प्रमोशन केले होते. त्यासंदर्भात चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले आहे. तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तिला विचारण्यात येणार आहे की, प्लेअरप्लेसाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला होता आणि त्यासाठी किती पैसे तिला देण्यात आले. एएनआयच्या ट्विटनुसार, तमन्नाला फेअरप्ले अॅपच्या आयपीएल 2023च्या अवैध स्ट्रीमिंगसंदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. ज्यामुळे वायकॉमला कोट्यावधींचे नुकसान झाले. त्यासंदर्भात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. तमन्ना भाटीयाच्या आधी 23 एप्रिल रोजी अभिनेता संजय दत्त यालाही याप्रकरणी समन्स बजावण्यात आला. संजय दत्त यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्याने सांगितले की तो मुंबईत नाही आणि दिलेल्या तारखेला ते उपस्थित राहू शकत नाही. त्याने आपले जबाब नोंदविण्यासाठी तारीख आणि वेळ मागितला.

अहवालानुसार, महाराष्ट्र सायबल पोलिसांनी वायकॉमकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासासाठी तमन्ना भाटिया आणि संजय दत्तला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला. याव्यतिरिक्त रॅपर बादशाहचाही याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आला आहे. बोलले जात आहे की, फेयरप्लेमुळे वायकॉमचे नुकसान झाले आहे. फेअरप्लेने आयपीएल 2023 ची अवैध स्क्रिनिंग आहे, ज्यामुळे व्हायकॉमचे 100 कोटीचे नुकसान झाले आहे.