अंबानी आता वॉशिंग मशीन, बल्ब, टीव्ही, एसी, फ्रीजही बनवणार

हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आता लवकरच नव्या व्यवसायात एन्ट्री मारणार आहेत. अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन मेड-इन-इंडिया ब्रँड डब्ल्यूवायझेडआरसह नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे.

मात्र या योजनेबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यातही या योजनेबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स सेगमेंटमध्ये परदेशी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्लॅन करत आहे. यासाठी डब्ल्यूवायझेडआर ब्रँडअंतर्गत मेड-इन-इंडिया उत्पादने लाँच केली जातील. अंबानींची कंपनी या योजनेअंतर्गत येत्या काही दिवसांत एलईडी बल्ब, टीव्ही, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन इ. उत्पादने बाजारात आणू शकते. रिलायन्स रिटेलने अलीकडेच व्हिझर या ब्रँड नावाखाली एअर कूलर लाँच केले.

रिलायन्स देणार टाटा, सॅमसंग, एलजीला टक्कर

सध्या देशातील टीव्ही, गृहोपयोगी उपकरणे आणि लहान उपकरणांची बाजारपेठ 1.1 लाख कोटी रुपयांची आहे. या मार्पेटमध्ये एंण्ट्री मारून रिलायन्स कंपनी टाटा,
सॅमसंग, एलजीला टक्कर देणार आहे.