>>नीलिमा प्रधान
मेष – अतिरेक टाळा
स्वराशीत बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. उत्साहाच्या भरात कोणतीही चूक करू नका. कायदा पाळा. अतिरेक टाळा. नोकरी टिकवा. धंद्यात अडचणींवर मात करा. शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक कार्यात दगदग, धावपळ होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठा जपा. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 27, 28
वृषभ – चर्चेत सावध रहा
वृषभेच्या व्ययेषात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. कला, क्रीडा, साहित्यात मन रमेल. कला क्षेत्रात विशेष घटना घडतील. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात लाभ, चर्चेत सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्याला पुढे नेता येईल. वरिष्ठांशी हितगुज होईल. कठीण कामे करता येतील. नवीन परिचय फायदेशीर ठरतील.
शुभ दिनांक ः 26, 30
मिथुन – नवीन परिचय होतील
मिथुनेच्या एकादशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सणांचा योग्य प्रकारे आनंद घेता येईल. नवीन परिचय होतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. प्रगती होईल. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारी घटना घडेल. मानसन्मान, पद मिळेल. लोकप्रियता वाढवणारी कामे करा. खरेदी-विक्रीत लाभ होईल.
शुभ दिनांक ः 26, 27
कर्क – कामात उत्साह राहील
कर्केच्या दशमेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. मैत्रीत, नात्यात तणाव जाणवेल. गैरसमज उद्भवतील. नोकरीच्या कामात उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यात वाढ होईल. दगदग, तणाव जाणवेल. वसुलीची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तींना कमी लेखू नका.
शुभ दिनांक ः 26, 30
सिंह – फसगत टाळा
सिंहेच्या भाग्येषात बुध, शुक्र, गुरू लाभयोग. सौम्य शब्दात मनोगत व्यक्त करा. कायद्याची कक्षा पाळा. नोकरीत दबाव राहील. धंद्यात लाभ, वाढ होईल. चर्चा करताना फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडतील. मनस्ताप, तणाव जाणवेल. तुमच्या ध्येयावर कामे करा. घरगुती कामे होतील.
शुभ दिनांक ः 26, 27
कन्या – तारतम्य ठेवा
कन्येच्या अष्टमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. घरात क्षुल्लक तणाव, खर्च, वाद होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत वर्चस्व राहील. मैत्रीत गैरसमज होतील. धंद्यात तारतम्य ठेवा. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामांना गती मिळेल. तुमच्या कामाचे क्रेडिट दुसरी व्यक्ती घेईल. प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक ः 27, 30
तुळ – उत्साहाचा अतिरेक नको
तुळेच्या सप्तमात बुध, सूर्य-चंद्र षडाष्टक. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा अंदाज चुकेल. कला-साहित्यात मन रमेल. थट्टामस्करी करताना सावध रहा. कोणतीही कृती, प्रतिक्रिया कायद्याला धरून करा. नोकरीत चूक टाळा. धंद्यात लाभ होईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात उत्साहाचा अतिरेक नको.
शुभ दिनांक ः 27, 30
वृश्चिक – नोकरीत वर्चस्व राहील
वृश्चिकेच्या षष्ठात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कठीण प्रश्नावर उत्तर शोधता येईल. नोकरीत वर्चस्व राहील. कुणालाही कमी लेखू नका. धंद्यात क्षुल्ल्क समस्या येतील. प्रवासात अडचण येईल. मैत्रीत गैरसमज उद्भवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याशी स्पर्धा करणारे वाढतील. कायद्याच्या विरोधात बोलू नका.
शुभ दिनांक ः 26, 30
धनु – कार्याला गतिमान करा
धनुच्या पंचमेषात बुध, शुक्र, हर्षल लाभयोग. मुलांच्या सहकार्याने पुढे जाल. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज उद्भवतील. तणाव वाढेल. नोकरीत कायदा पाळा. चूक टाळा. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला गतिमान करा. लोकप्रियता वाढवा. स्वतचे स्थान मजबूत करा.
शुभ दिनांक ः 26, 27
मकर – समस्या कमी होतील
मकरेच्या चतुर्थात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. मैत्री करण्यास अनेक व्यक्ती येतील. तुमच्या कार्याचा प्रभाव वाढेल. नोकरीत प्रगती व लाभ होईल. धंद्यात लाभ होईल. समस्या कमी होतील. कोणतेही क्षेत्र असो, प्रतिक्रिया सौम्य ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जाल. तुमचे महत्त्व इतरांना पटेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायी वातावरण असेल.
शुभ दिनांक ः 26, 30
कुंभ – कामात प्रावीण्य मिळेल
कुंभेच्या पराक्रमात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला वाद, दुखापत होईल. नोकरीच्या कामात प्रावीण्य मिळेल. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कठीण कामे कराल. धंद्यात वाढ होईल. दूरदृष्टीकोनातून गुंतवणूक करा. खरेदीविक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगल्या घडामोडी घडतील.
शुभ दिनांक ः 27, 30
मीन – वाहनाचा वेग कमी ठेवा
मीनेच्या धनेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. भावनेत गुंतून कोणतीही चूक करू नका. वाहनाचा वेग कमी ठेवा. दुखापत, वाद टाळा. नोकरीत चांगले बदल करण्याचे प्रयत्न करा. धंद्यात समतोल राखा. संधीची वाट पहा. उतावळेपणा नको. व्यसन नुकसान करेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटेल. पद, अधिकार लाभेल.
शुभ दिनांक ः 26, 30