Photo – कपाळावर टिकली, कानात झुमके, हीना खानचा साडीतील ग्लॅमरल लूक होतोय व्हायरल

टिव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या अभिनयाबरोबरच सौदर्यं आणि स्टाईलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे. हीनाने नुकतेच साडीतले फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिने काळ्या रंगाचा ट्युब स्टाईल स्ट्रेपी ब्लाऊज लो नेकलाईनच्या ब्लाऊजवर जॉमेण्ट्रीक अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेली लाल रंगाची साडी नेसली आहे. हिनाने कपाळावर बारीक टिकली, लाईट आयशॅडो, हायलायटर, पापण्यांना मस्करा असा मेकअप केला आहे, साडीवर केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये हिना सुंदर दिसत असून चाहत्यांकडून तिच्या या फोटोंचे कौतुक होत आहे. .