‘सोढी’ बेपत्ताच… कुटुंबीय चिंतेत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून घराघरांत पोचलेला अभिनेता रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग दोन आठवडय़ांपासून बेपत्ता आहे. अद्याप पोलिसांना गुरुचरण सिंगचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. मुलाची काहीच ठोस माहिती मिळत नसल्याचे गुरुचरणचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ‘जे काही झालंय ते धक्कादायक आहे. पोलिसांकडून मुलाबद्दल काहीतरी अपडेट मिळेल याची आम्ही तीव्रतेने वाट पाहतोय. त्याच्या घरी येण्याची आम्ही वाट पाहत आहोत,’ असे हरगीत सिंग म्हणाले.