शाहिद खानचे शतक; चिन्मय दुखंडेच्या 6 विकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा 14 वर्षांखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱया ड्रीम 11 कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया दोनदिवसीय साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (104 धावा) शतकी खेळीमुळे सर्व बाद 229 धावा केल्या. याच लढतीत वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर चिन्मय दुखंडे याने 40 धावांत 6 बळी घेण्याची करामत केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद 83 धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.

ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्राr संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने 115 चेंडूंत 12 चौकारांसह 104 धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (27) यांच्यासह 98 धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (21) आणि वेदांत कडू (19) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने 40 धावांत 6 बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला 67 षटकांतच 229 धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळत आहे 35) आणि ईशान पाठक (खेळत आहे 40) या सलामीवीरांनी 25 षटकांत 83 धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे.

संक्षिप्त धावफलक

रवी शास्त्राr संघ ः 67 षटकांत सर्व बाद 229 (आयांश चित्कारा 21, शाहिद खान 104, पार्थ ठक्कर 27, वेदांत कडू 19; चिन्मय दुखंडे 40 धावांत 6 बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ ः 25 षटकांत बिनबाद  83 (अरहाम जैन खेळत आहे 35, ईशान पाठक खेळत आहे 40).

सुनील गावस्कर संघ ः 95 षटकांत 9 बाद 249 (स्वानंद पालव 28, स्मित ठाकूर 31, वेदांग मिश्रा 48, शेन रझा 52, आयुष गोहो 22; हार्दिक गजमल 49 धावांत 2 बळी, हर्ष कदम 33 धावांत 4 बळी, मोक्ष निकम 57 धावांत 3 बळी) वि. सचिन तेंडुलकर संघ.