घटस्फोटांच्या बातम्यांवर दिव्या अग्रवालने सोडले मौन, म्हणाली…

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल हिचे खासगी आयुष्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. तिने तीन महिन्यांपूर्वी बॉयफ्रेण्ड उद्योजक अपूर्वा पाडगावकर याच्याशी लग्न केले होते. मात्र नुकतेच तिने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आणि त्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांना उधाण आले. अखेर आता यावर दिव्याने मौन सोडले आहे.

दिव्या अग्रवालने आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहीले आहे की, मी कोणताही आवाज केला नाही. ना मी यावर काही बोलले ना कमेण्ट्स केल्या. मी माझ्या अकाऊंटवरील 2500 पोस्ट डिलीट केल्या. पण माध्यमांनी लग्नाचे फोटो न दिसल्याने रिअॅक्ट केले आहे. तिने पुढे लिहीले की, यामुळे कळले की लोकं माझ्य़ाकडून काय अपेक्षा करतात. माझ्या आयुष्यात कायम मी तेच करते जे लोकांनी माझ्याकडून कधी अपेक्षा केली नसेल. लोकं फक्त आता घटस्फोट की मुलं हीच अपेक्षा करतात. मात्र या दोघांपैकी काहीही नाही आहे. खरंतर माझ्या इन्स्टावर जी पहिली पोस्ट पिन केलेली आहे, मला फक्त त्याबद्दल बोलायचे आहे. प्रत्येक कथेचा अंत आनंदी असतो.

घटस्फोटांच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना दिव्याने सांगितले, देवाच्या आशिर्वादाने माझा नवरा अपूर्वा पाडगावकर माझ्या शेजारी आरामात झोपला आहे. दिव्याला दोन दिवसांपूर्वीच तिच्या नवऱ्यासोबत पाहिले होते. या दरम्यान वेस्टर्न आऊटफीटसह सिंदूर परिधान करताना दिसली. दोघे एकत्र खूप आनंदी होते आणि दोघांनी एकत्र अनेक फोटो क्लिक केले. दिव्या अग्रवालने 20 फेब्रुवारी रोजी अपूर्वा सोबत लग्न केले होते. या लग्नात दिव्याने जवळच्या लोकांना आमंत्रण दिले होते. त्यावेळी या जोडप्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.