अमेरिकेत चक्रीवादळाचा धुमाकूळ; 18 जण ठार, 42 जखमी

अमेरिकेच्या टेक्सास, ओक्लाहोमा आणि अर्कान्सास या तीन राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 हून अधिक लोक जखमी झाले. वादळ, गारपीट आणि जोरदार वाऱयामुळे जवळपास 10 कोटी लोकांना याचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक इमारती, वीज, गॅस लाईन आणि एक इंधन पेंद्र नष्ट झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे. इलिनॉय, पेंटकी, मिसूरी आणि टेनेसी या शहरांचे सर्वाधिक नुकसान झाले.